यावल:- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल नगरपरिषद व महाविद्यालयातील विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यावल नगरपरिषद शहर समन्वयक सौ. स्नेहा रजाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव हा समाजाच्या विविध ठिकाणी लोकांनी एकत्रित यावे हा उद्देश आहे, परंतु आज ते चित्र बदलले आहे. वर्तमान युगात गणेश उत्सव साजरे करताना शहरी व ग्रामीण भागातील गणेश मंडळांतील मिरवणुकीत, विसर्जन करण्यासाठी मोठमोठ्याने डीजे, लाऊड स्पीकर त्यातून हवा प्रदुषण व ध्वनी प्रदूषण होते हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच मोठ्या प्रमाणात गुलाल, प्लास्टिक, रासायनिक जैविक घटकांची उधळण केली जाते त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचून प्रदूषणाचे प्रमाण वाढत जाते. प्राणी व वनस्पती तसेच मानवी आरोग्यावर परिणाम होतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की ,सध्याच्या वर्तमान युगात गणेश उत्सव साजरे करताना मोठ्या प्रमाणात गुलाल, प्लास्टिक पिशव्या यांचा वापर केला जातो. त्यामुळे जल प्रदुषण होते. त्याच बरोबर सांऊड- स्पीकर, डिजेच्या आवाजाने ध्वनी प्रदुषण होते. हे जर टाळायचं असेल तर समाजात जागृती निर्माण करणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे माणसाचे कर्तव्य आहे असे विशद केले. प्रदुषण स्वच्छता निरीक्षक नितेश चांगरे, नगर परिषदेचे कर्मचारी महेंद्र चव्हाण, राहुल चव्हाण, रवी भालेराव, शाहरुख खाटीक तसेच डॉ. हेमंत भंगाळे डॉ. सुधीर कापडे, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. मनोज पाटील, प्रा. चिंतामण पाटील, प्रा. संजीव कदम, प्रा. अरुण सोनवणे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कामडी, डॉ. संतोष जाधव, प्रा. छात्रसिंग वसावे, प्रा. नरेंद्र पाटील प्रा. मिलिंद मोरे प्रा. प्रशांत मोरे, मिलिंद बोरघडे, प्रमोद जोहरे, प्रमोद कदम, अनिल पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.