नंदुरबार:- जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे मार्च 2025 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 3 मार्च, 2025 रोजी दुपारी 01:00 वाजता जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. जनतेच्या तक्रारी व अडचणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भामरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.