जि प प्राथ. शाळा शिरसाड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जि. प. प्राथ. शाळा शिरसाड येथे दि.८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला रुखमाबाई रामदास पाटील या होत्या.कु.देवयानी हिरालाल धनगर व कु. खुशी लीलाधर काटे या विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले. विद्यार्थिनींचेच प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत शाळेचे वरिष्ठ शिक्षक राजाराम मोरे यांनी केले. सर्व मान्यवर महिलांचे स्वागत विद्यार्थिनींनी पुष्पगुच्छ देऊन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी आकांक्षा ठाकूर हिने केले. कार्यक्रमाला मंगला अत्तरदे, कोकिळा पाटील,वैशाली भालेराव,दिपाली तळेले, तनुजा तडवी, शुभांगी तायडे, नयना तडवी शाळेतील शिक्षक राजेंद्र अटवाल, दीपक चव्हाण,संदीप बारी, मेहबूब शेख, शिवदास महाजन, राजेंद्र महाजन हे उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम हा शाळेतील विद्यार्थिनींनी यशस्वी केला.