उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. अक्षय सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भारतीय लोकशाहीला अभिप्रेत असणारे संविधानाने मतदानाचा हक्क आणि मुलभूत अधिकार दिलेले आहेत भारत हा लोकशाही प्रधान देश असल्यामुळे भारतात लोकप्रतिनिधी हे मतदान करूनच जनतेच्या विकासासाठी निवडून दिले जातात असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना भारतीय न्यायसहिता भारतीय संविधान व राज्यघटना माहितीसाठी व अभ्यासाच्या सोयीसाठी अभ्यास करायला हवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवसात राज्यघटना लिहून पुर्ण केली २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राष्ट्रपतींना सुपुर्त केली १८ वर्षांवरील नागरीकांना मतदान जनजागृती संदर्भात मार्गदर्शन करायला हवे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा प्रतिभा रावते यांनी केले तर आभार प्रा. अर्जुन गाढे यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. आर डी पवार, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा. सोनाली पाटील, डॉ. संतोष जाधव,प्रा.नरेंद्र पाटील, प्रा. सी टी वसावे,प्रा. हेमंत पाटील, प्रा.प्रशांत मोरे, प्रा. प्रशांत मोरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.