उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- येथे ओवी इनोव्हेशन आणि एक्सपोर्ट फार्मर प्रोड्यूसर कंपनी यावल, व कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्या संयुक्त विद्यमाने खानदेश केळी महोत्सव ‘ आयोजित करण्यात आला होता. त्यात कृषी विज्ञान केंद्र पाल व जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल यांच्यात सामंजस्य करार (MOU) असल्याने यावल महाविद्यालयातील प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व कृषी विज्ञान केंद्र पाल येथील प्राचार्य डॉ. महेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली खानदेश केळी महोत्सवात यावल महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या महोत्सवामध्ये केळी पासून बनविलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल लावण्यात आलेले होते तसेच यात विविध कृषि विषय खते,पीक लागवड, तसेच केळी पासून बनविलेले विविध पदार्थ. इ. विद्यार्थिनी निरीक्षण करून माहिती घेतली. तसेच कृषि विज्ञान केंद्र पाल येथील अनेक तज्ञ सदर महोत्सवात सहभागी होते त्यांनी विद्यार्थाना केळी पिकाची सेंद्रिय पद्धतीने लागवड कशी करावी व त्याचे वर्षभर कसे नियोजन करायचे या विषयी सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातर्फे डॉ.निर्मला पवार, डॉ. वैशाली कोष्टी ,प्रा.सी.टी.वसावे प्रा.अर्जुन गाढे,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.हेमंत पाटील व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.