उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल: तालुक्यातील नावरे येथील मूळ रहिवासी असलेले सेवानिवृत्त सैनिक (आर्मी रिटायर ) जितेंद्र पांडुरंग पाटील (वय-४३) यांचे दि.२३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हृदयविकाराचा झटक्याने पटियाला (पंजाब) येथे दुःखद निधन झाले.ते एका महिन्यापूर्वीच आपल्या देशाच्या संरक्षणसेवेतून सेवानिवृत्त झालेले होते व सध्या पटियालाला त्यांचा रहिवास होता.या अकस्मात घडलेल्या दुःखद घटनेने साकळीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांची अंत्ययात्रा आज दि.२४ मार्च २०२५ रोजी नावरे येथील राहत्या घरून निघणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,आई,मोठे भाऊ असा परिवार आहे.ते साकळी वीज वितरण कार्यालयाचे वीज कर्मचारी नितीन पांडुरंग पाटील तसेच शिवाजी अजबराव पाटील यांचे मोठे बंधू तर साई जितेंद्र पाटील,मयुर जितेंद्र पाटील यांचे वडील होत.