यावल महाविद्यालयात पत्रलेखन व रांगोळी स्पर्धा संपन्न

0

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी विभागाअंतर्गत पत्रलेखन व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. पत्रलेखन स्पर्धे मध्ये 07 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला प्रथम मृणालिनी सत्यवान पाटील (एफ .वाय .बी ए) द्वितीय पुनम विठ्ठल चौधरी (एफ .वाय .बी .एस .सी) तृतीय रत्ना दिनेश बारेला (टी. वाय .बी .ए) यांनी यश प्राप्त केले. तसेच रांगोळी स्पर्धेत 08 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. प्रथम रेतना दिनेश बारेला (टी. वाय .बी .ए), द्वितीय दीक्षा राजू पंडित (एफ .वाय .बी. ए) तृतीय दिपाली भीमराव पाटील (एफ. वाय. बी .एस .सी) सदर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार,प्रा. ए. पी.पाटील, हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी व्ही पावरा, प्रा. प्रतिभा रावते व प्रा. रजनी इंगळे यांनी सहकार्य केले.