डॉ धिरज चौधरी यांनी वाचवीला रस्त्यांवर पडलेल्या युवकांचा जीव डॉ ठरले अखेर देवदुत !

0

उपसंपादक, दिपक नेेवे मो:9665125133

यावल:- तालुक्यातील अंजाळे गावाजवळच्या हनुमान मांदिर जवळ यावल शहरातील देशमुख वाडयातील युवकाला स्वतंच्या गाडीत बसुन त्या युवकांचे प्राण वाचवुन यावल येथील डॉ धिरज चौधरी देवदुत ठरले. यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ हनुमान मंदिर जवळ यावल येथील देशमुख वाड्यातील गुड्डु देशमुख वय ४५ बेशुध्द अवस्थेत पडुन होते त्यांचा १६ वर्ष वयाच्या मुलगा रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीनां मदत मागत असताना कुणीही समोर आले नाही त्यावेळी यावल शहरातील चौधरी हॉस्पिटल चे संचालक डॉ धिरज चौधरी भुसावळ येथे जात असताना पाहिले व त्वरीत गाडी रस्त्यांचा बाजूला थाबूंन बेशुद्ध अवस्थेत पडुन असलेल्या युवकाला स्वंताच्या गाडीत टाकुन भुसावळ येथील डॉ निलेश महाजन यांच्या साई पुष्प हॉस्पीटल मध्ये दाखल केले मात्र तिथे डॉक्टर नसल्यामुळे त्यांनी तिथे स्वंतहा रुणावर उपचार करून रिदायम हॉस्पीटल मध्ये दाखल करून नातेवाईक यांना दुरध्वनी व्दारे माहिती दिली व दवाखान्यात बोलवून घेतले व त्या युवकांच्या जीव वाचवून अखेर देवदुत ठरले.