उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
रस्ता सपा करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागास गावकरिंची मागणी !
यावल:- तालुक्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर मुख्य रस्त्याला जोडलेला रस्ता म्हणजे चुंचाळे फाटा ते गांव रस्त्यावर दि.६ मे रोजी झालेल्या तुफानी पाऊस व वादळीवाऱ्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले होते तर या मुख्य रस्त्यावर अनेक झाडे तुटून पडले आहेत तर काही झाडें उपटून पडले आहेत, या झाडांची विल्हेवाट लावण्याची चुंचाळे बोराळे गावाकऱ्यांनी मागणी केली आहे. आज अवघे ७ दिवस उलटून सुद्धा या रस्त्यावर पडलेल्या झाडांची सार्वजनिक बांधकाम विभाग यावल चे अधिकारी विल्हेवाट लावत नाहीत, या मुळे मोठी खंत गावकरी यांच्या वतीने व्यक्त केली जात आहे, चुंचाळे फाटा ते बोराळे,चुंचाळे, नायगाव,मालोद, आडगाव या रस्त्याने लालपरी सुद्धा नेहमी धावते, तिला ये, जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे, रस्त्यावर मोटार सायकली व केळी वाहतूक करणाऱ्या ट्रक, शेतकऱ्यांचे बैल गाडे व पायी चालणाऱ्या लोकांना मोठी झळा सोसावी लागत आहे, म्हणून या रस्त्यावर पडलेल्या झाडांची लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने विल्हेवाट लावावी, हा रस्ता सपा करावा, या प्रकारची मागणी गावाकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.
रस्त्यावर पडलेले झाडे देत आहेत अपघातास निमंत्रण
मुख्य रस्त्यावर पडलेले अनेक झाडे,रस्तावर येणाऱ्या नवीन वाहणास अंदाज जर नाही आला तर मोठा अपघात होवू शकतो, कोणाला तरी या मुळे जीव गमवावा लागू शकतो, म्हणून मोठी जीवित हानी होवू शकते, त्यामुळे ह्या रस्तावर पडलेले झाडें मृत्यूस चेतावणी,निमंत्रण देत आहेत असे म्हणण्यास काही वावळे नाही.
सार्वनिक बांधकाम विभागाचे या कडे दुर्लक्ष
६ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे चुंचाळे, बोराळे सह परिसरात अनेक ठिकाणी झाडे उपटून पडले आहेत, या संदर्भात पत्रकार सुपडू संदानशिव यांनी ८ मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे हर्षल कवीश्वर शाखा अभियंता व विकास जंजाळे वरिष्ठ लिपिक यांना फोन करून सुद्धा, या प्रकरणाची दखल घेण्यास टाळाटाळ झाली असून एखादया व्यक्तीचा जीव जाईल तेव्हा प्रशासन ठिकाणावर येईल का? किव्वा याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असतील का? हा प्रश्न निर्माण होत आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकर घ्यावी अशी मागणी, चुंचाळे बोराळे सह परिसरातील लोकांच्या वतीने होत आहे.