जळगाव:- तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एस एस परीक्षेचा निकाल 95 टक्के लागला असून शाळेतून सागर विजय अस्वार याने 93.80% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक समर्थ किरण पाटील 92.40% व तृतीय क्रमांक मयुरी प्रवीण बारी 92% या विद्यार्थिनी पटकावला. मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत शाळेतून 230 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 218 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेतील 76 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून पाच विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेत. शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष अशोक अस्वार ,शालेय समिती चेअरमन कमलाकर तांदळे, सचिव सुरेश अस्वार,उपाध्यक्ष दिलीप बारी, संचालक निलेश खलसे, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व पर्यवेक्षक आर के पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एस एस सी...