पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या गुणवंत कर्मचारी पुरस्काराने साकळीचे योगेश नेवे सन्मानित !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

साकळी ता.यावल:- पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद जळगाव तसेच रूट्स बायोटेक प्रा.लि.यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक पशुवैद्यकीय दिनाच्या तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने गुणवंत कर्मचारी पुरस्काराचे वितरण करून कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमात यावल पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुवैद्यक कर्मचारी योगेश गुलाब नेवे (वाय.जी. नेवे) यांना जळगाव जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी साहेब, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त प्रदीप रावळ साहेब तसेच जळगाव जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाहेत तडवी या मान्यवरांच्या हस्ते सन – २०२५ या वर्षाच्या गुणवंत कर्मचारी पुरस्काराने गौरवण्यात आले. सदर कार्यक्रम जळगाव येथे रतनलाल सी. बाफना गोशाळेत दि.२ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला होता.सदर पुरस्कार प्राप्त योगेश नेवे हे मुळ साकळी ता.यावल येथील रहिवाशी असून त्यांनी साकळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी म्हणून उत्तम प्रकारे काम केलेले आहे. ‘मुक्या प्राण्यांची सेवा… हीच खरी ईश्वरसेवा ‘ हा दृष्टिकोन नेहमी समोर ठेवत श्री नेवे हे अहोरात्र मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी त्यांच्या उपचारासाठी सदैव तत्पर असतात.सेवेचा खूप मोठा काळ लोटला गेल्याने त्यांना पशुवैद्यक कामाचा खूप मोठा अनुभव जवळ असल्याने ते या त्यांच्या कामाने साकळीसह पंचक्रोशीत सुपरिचित आहे.कार्यक्षेत्रातील गुर- ढोरांना लसीकरण,उपचार तसेच त्यांच्यावरील कठीण सर्जरी मध्ये त्यांनी अगदी सदैव सहभाग दिलेला असून या कामासाठी तत्पर असतात.सन-२०२२ मध्ये गुरांवर आलेल्या लंपी संसर्गादरम्यान कार्यक्षेत्रातील सर्व गुर- ढोरांना लसीकरण करण्याच्या कामासाठी नेवे यांचा खूप मोठा सहभाग होता. या सर्व त्यांच्या कामाची पावती म्हणूनच त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.