साकळी ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उभारली गुढी !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

साकळी ता.यावल:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दि.६ जून रोजी साकळी ग्रामपंचायत कार्यालयात राजमुद्रा चित्रित केलेली भगव्या ध्वजपताकांची स्वराज्यभिषेक गुढी उभारण्यात आली होती.लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक गुढीचे पूजन करण्यात आले.महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत यांच्या स्वरात गुढीला वंदन करण्यात आले.प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य खतीब तडवी,परमानंद बडगुजर,मुकेश बोरसे,विनोद खेवलकर यांचे सह ज्येष्ठ कर्मचारी पंढरीनाथ माळी,वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली,कर्मचारी लीलाधर मोरे, सर्व कर्मचारी उपस्थित होते.शिवराज्याभिषेक गुढी उभारल्यामुळे परिसरात चैतन्याचे व उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते.