वंदे मातरम गीताचा १५० वा वर्धापन दिन; जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक गायन

3

छत्रपती संभाजीनगर, दि.७ (जिमाका)- वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात वंदे मातरम गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) श्रीमती संगिता राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.