यावल:- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत दिनांक 1 ऑक्टोबर 2023 शनिवार रोजी सकाळी 10 ते 11 एक तास स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता साठी श्रमदान महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील परिसरात श्रमदान करून साफसफाई करण्यात आली. महाविद्यालयातील मैदानावरील प्लास्टिक व इतर कचरा जमा करून जाळण्यात आला. तसेच यावल फैजपुर रोडवर स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्वच्छता कर्मचारी श्री महेश घारू यांचा सत्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. पवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एच. जी. भंगाळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रतिभा रावते, प्रा. नरेंद्र पाटील संतोष ठाकूर, अनिल पाटील, अमृत पाटील, प्रमोद जोहरे तसेच मयूर लोधी, मनोज पाटील, स्वाती बारी, शुभांगी धनगर आदींनी परिश्रम घेतले.