यावल महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी !

0

यावल:- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह. समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. प्रारंभी थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील होते. प्रमुख वक्ते भूगोल विभागाचे प्रा. नरेंद्र पाटील होते. यावेळी अध्यक्ष प्रा. ए. पी. पाटील यांनी महात्मा गांधी हे अहिंसेची पुजारी होते. स्वातंत्र्यसंग्रामात सत्य व अहिंसा या दोन मार्गामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान चा नारा लावून सैनिक व शेतकऱ्यांना बळ दिले. अशा थोर विभूतींचे विचार आत्मसात करून अंगीकार केला पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे वक्ते प्रा. नरेंद्र पाटील यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर आई वडिलांचा प्रभाव होता. महात्मा गांधीजींचे कार्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप महान होते. तसेच त्यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनपटावर प्रकाश ज्योत टाकला. यावेळी डॉ. एस. पी. कापडे, डॉ. एच. जी. भंगाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉ. आर. डी. पवार यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संतोष ठाकूर, अमृत पाटील, प्रमोद जोहरे, अनिल पाटील आदींनी सहकार्य केले.