साकळी येथे अंगणवाडी विभागाकडून “सही पोषण-देश रोशन” अभियानावर कार्यक्रम

0

यावल:- शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत साकळी बिट विभागातील सर्व अंगणवाड्या कडून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत मिशन तर्फ राबविल्या जाणाऱ्या ‘सही पोषण-देश रोशन ‘अभियानावर साकळी येथे नुकताच एकदिवसीय कार्यकम विविध उपक्रमाने घेण्यात आला.या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुषा गायकवाड होत्या.तर प्रमुख अतिथी जळगाव जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र (छोटूभाऊ) पाटील, भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डॉ.सुनिल पाटील, ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे, साकळीचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी, साकळी जि.प.मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंगला सपकाळे,शिरसाड जि.प.शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र पाटील,सामाजिक कार्यकर्ते नितिन फन्नाटे,पर्यवेक्षिका शोभा पाटील मॅडम, जाधव मॅडम, कल्पना तायडे परिसरातील शाळां मधील शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते डॉ.सुनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.तसेच सीडीपीओ अर्चना आटोळे मॅडम यांनी माता पालक तसेच मुलींना रखोल मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास्थळी केंद्र शासनाच्या मेरी मिट्टी-मेरा देश या उपक्रमानुसार मान्यवरांच्या हस्ते मातीचे पूजन करण्यात आले. तसेच गरोदर माता, स्तनदा माता तसेच लहान मुलांच्या पोषण आहाराविषयी माहिती देणारे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आलेले होते.त्याचप्रमाणे विविध अशा जनजागृती विषयावर रांगोळी तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना तसेच सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.शोभा पाटील मॅडम यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत नेवे केले. तसेच आभार प्रदर्शन सौ.मंगला नेवे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साकळी बिटच्या सर्व अंगणवाडी सेविका, मतदनिस यांनी अनमोल सहकार्य केले.