यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रबोधनी कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा. संजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. नरेंद्र पाटील यांनी ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर बोलताना सांगितले की वृक्ष ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मानवी विकासाच्या दृष्टीने पर्यावरण संवर्धन करणे महत्त्वाचे आहे सध्या जंगल तोडीमुळे तापमान वाढत आहे. प्रजन्यमान कमी होत आहे. ग्रामीण भागात अंत्यसंस्कार करण्यासाठी,वस्तु बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते, त्यामुळे पर्यावरणाचा -हास होतो हे रोखण्यासाठी वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज परिस्थिती बिकट होत चाललेली आहे पर्यावरण धोक्यात येत आहे. मानवी विकासाबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे भू- प्रदुषण रोखले तर सुपीक जमीनीतून धान्यसाठा वाढेल पोषण युक्त अन्न मिळेल, आरोग्य सुरक्षित राहील, मोठ्या प्रमाणात जल प्रदुषण होते, कारखान्यातील दूषित पाणी नदीला सोडले जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मरतात, वायु प्रदुषण वाहणातील, कारखान्यातील धूराने कार्बन मोनाक्साईड बाहेर पडतो त्यामुळे दूषीत वातावरण निर्माण होऊन मानवी आरोग्यावर परिणाम होतो, नर्सरी रोपवाटिकावर ग्रीन हाऊस एसी. एफ. वायु. तयार होत असतो. पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पातळीवरील जी. ट्वेंटी शीखर परिषद, जिनिव्हा संघटनेने दखल घेतली गेली आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. रजणी इंगळे यांनी केले. आभार प्रा. मिलिंद मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. एस. पी. कापडे, डॉ. हेमंत भंगाळे, प्रा. मनोज पाटील, प्रा. अरुण सोनवणे, प्रा. मुकेश येवले, प्रा. एकनाथ सावकारे, हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संतोष जाधव, प्रा. सुभाष कामडी, डॉ. निर्मला पवार, प्रा. प्रशांत मोरे, प्रा. अक्षय सपकाळे, प्रा. नंदकुमार बोधडे, श्री रमेश साठे, श्री. संतोष ठाकूर, श्री प्रमोद भोईटे, श्री. अनिल पाटील यांनी सहकार्य केले