यावल महाविद्यालयात “वन्यजीव संरक्षण सप्ताह” संपन्न !

0

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागामार्फत दि. 2/10/ 2023 ते 8/10/ 2023 दरम्यान “वन्यजीव संरक्षण सप्ताह” साजरा करण्यात आला. “वन्यजीव संरक्षण सप्ताह” या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना पृथ्वीवरील सजीवाचे वातावरण व अन्नसाखळीमध्ये असलेले महत्त्व विशद केले. तसेच सजीव प्राणी व नैसर्गिक साधन संपत्ती यांचे सहसंबंध मानवी जीवनावर कसे परिणाम करतात याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यासमोर मांडली. “वन्यजीव संरक्षण सप्ताह” ह्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम. डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील, प्रा.संजय पाटील, डॉ. आर. डी. पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. मयुर सोनवणे यांनी केले. “वन्यजीव संरक्षण सप्ताह” अंतर्गत दि.6 ऑक्टोंबर 2023 “वन्यजीव संरक्षण वनस्पती व प्राणी” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी “वन्यजीव संरक्षण सप्ताह” विषयावर प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली.दि. 9/ 10 /2023 रोजी महाविद्यालयात “वन्यजीव संरक्षण सप्ताह” अंतर्गत मानवी हस्तक्षेपामुळे मधमाशी काल बाहेर या विषयावर प्राणीशास्त्र विभागप्रमुख व महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांचे व्याख्यान संपन्न झाले. व याच विषयावर प्राणिसशास्त्र विभागाचे प्रा. मयुर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राजू तडवी, प्रा. चिंतामण पाटील यांनी परिश्रम घेतले.