यावल:- येथील महाविद्यालयात प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.7 ऑक्टोंबर रोजी विद्यार्थी विकास विभागातर्फे जादूचे प्रयोग हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मनोज पाटील सर होते. विविध जादूचे प्रयोग विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. ए पी पाटील प्रा डॉ एच.डी भंगाळे प्रा इ आर सावकार, प्रा.सी के पाटील सर, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख डॉ. प्रा एस पी कापडे, श्री आर एस थिगळे. विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.