चुंचाळेसह परिसरात जोरदार वादळी पावसाची हजेरी !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

केळीच्या बागांचे मोठे नुकसान !

चुंचाळे ता.यावल:- आज दि.६ रोजी दुपारच्या वेळी चुंचाळे सह परिसरात अति वेगाने वादळ झाले व त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.वादळामुळे बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे विज तारा तुटल्या आहे.वादळामुळे केळी बागांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. आज दि.६ रोजी दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा खूप जाणवत होता.त्यानंतर दुपारी पाच ते साडेपाच वाजेनंतर वातावरणात अचानक बदल व्हायला सुरुवात झाली.त्यानंतर सोसाट्याचा वारा सुटून जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार वादळ झाले.वादळामुळे परिसरात चुंचाळे, साकळी,शिरसाड,नावरे,मनवेल सह परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली आहे.काही ठिकाणी विजेचा तारा तुटल्या असल्याचे वृत्त आहे.वादळानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.पावसाचे पाणी रस्त्यावरून चांगले वाहून निघाले.पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होणार आहे.तर परिसरात अनेक शेतांमध्ये केळीच्या भागात जमीनदोस्त झाल्याचे बोलले जात आहे.जवळपास तास ते दिड तास पावसाने हजेरी लावली.पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.दिलीप नेवे , दामू पाटील, नितीन पाटील ,प्रदीप पाटील ,नाना धनगर विलास धनगर , प्रोमद निळे ,शेखर धनगर, रवींद्र पाटील, चेतन पाटील,योगेश नेवे यांच्या सह शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.